Ad will apear here
Next
बोरगडी तांडा येथील रस्त्याचे सात मार्चला भूमिपूजन
रस्त्याच्या मागणीसाठी ऑडिओ ब्रिजद्वारे थेट मुख्यमंत्र्यांशी साधला होता संवाद
हिमायतनगर : ‘स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मौजे बोरगडी ते बोरगडी तांडा एक व दोन यांना जोडणारा रस्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून मंजूर झाला असून, या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा सात मार्च २०१९ रोजी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोरगडी तांडा क्रमांक एक व दोन यांना जोडणारा रस्ता स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत झाला नव्हता. या रस्त्याची अंदाजे लांबी ३.५ किलोमीटर आहे. नदीकाठावर असलेल्या या दोन्ही तांड्याना जाण्यासाठी पक्के रस्ता नसल्याने वस्तीतील एक हजार नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखलाचा, तर उन्हाळ्यात खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागत होता. पर्यायी रस्ता नसल्याने दळणवळणाचाही प्रश्न गंभीर बनला होता. या समस्येकडे लक्ष देऊन तत्काळ पक्का रस्ता करून द्यावा, अशी मागणी पाच नोव्हेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऑडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तत्कालीन तहसीलदार गजानन शिंदे यांच्या उपस्थितीत काईतवाड यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक कोटी १५ लाखांचा निधी या रस्त्यासाठी मंजूर केला.

त्यानंतर बोरगडी येथे आमदार पाटील यांनी २५/१५ अंतर्गत १० लाखांचा निधी दिला असून, येथील मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले. या दोन्ही रस्त्यांचा भूमिपूजन सात मार्चला होणार आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZWMBY
Similar Posts
हिमायतनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील अनेक तरुणांनी आणि काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा कार्यक्रम नगरपंचायतीच्या प्रांगणात आठ जुलै २०१९ रोजी झाला.
हिमायतनगरमधील सरसम येथे रस्त्याचे उद्घाटन हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्थानिक निधीतून सरसम येथील इंदिरानगरमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
हिमायतनगरमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हिमायतनगर : ‘हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी काम करावे. नवे-जुने असा भेद न करता सर्वांनी एकजुटीने कार्य करावे,’ असे आवाहन हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी केले.
हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील यांचा प्रचार वेगात हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांचा प्रचार दौरा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language